ओळख

इयत्ता 8 वी मराठी माध्यमात शिकणाऱ्या सर्व छोट्या मित्र मैत्रिणींचे 8vimarathi.com मध्ये मनःपूर्वक स्वागत!
आज आपल्या महाराष्ट्रात इयत्ता 8 वी मराठी माध्यमात शिकणारे लाखो विद्यार्थी आहेत. ह्यातले काही विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक ह्यांसारख्या शैक्षणिक सुखसोई असलेल्या महानगरातले असले तरी त्यापेक्षा कितीतरी पट मोठी संख्या ही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. हे भाग असे आहेत कि जिथे शैक्षणिक असुविधांबरोबरच नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक समस्या आहेत. त्याच बरोबर प्रचंड प्रमाणात वीज आणि वाहतुकीच्या समस्याही आहेत. पण सुदैवाने ह्यातले बरेचसे भाग आता मोबाईल आणि इंटरनेटने जोडले गेलेलले आहेत. आणि शासनाचेही इंटरनेट जोडणी आपल्या राज्यात सर्वदूर पोहोचविण्याच्या बाबतीत सतत प्रयत्न चालू आहेत.
अशा ह्या महाराष्ट्रभर विखुरलेलय विद्यार्थ्यंना गणित आणि विज्ञान हे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजावेत ह्यासाठी “8 वी मराठी” इंटरनेटच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
इयत्ता 8 वीचे पाठयपुस्तक: इथे क्लिक करा