इयत्ता 8 वी समांतर रेषा व छेदिका सोप्या शब्दात

इयत्ता 8 वी समांतर रेषा व छेदिका सोप्या शब्दात

समांतर रेषा म्हणजे काय?

एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात (एका प्रतलात म्हणजे एकाच पृष्ठभागावर किंवा एकाच पातळीत असणे).

समांतर रेषा म्हणजे काय?

वरील आकृतींमध्ये रेषा A आणि रेषा B ह्या एकमेकींना समांतर आहेत कारण त्या P1 ह्या एकाच प्रतलात आहेत आणि त्या रेषा एकमेकिंना न छेदणाऱ्या आहेत. तसेच  रेषा C आणि रेषा D ह्या एकमेकींना समांतर आहेत कारण त्या P2 ह्या एकाच प्रतलात आहेत आणि त्या रेषा एकमेकिंना न छेदणाऱ्या आहेत.

पण रेषा A आणि रेषा B  ह्या रेषा C किंवा रेषा D ला समांतर नाहीत कारण त्या दोन भिन्न प्रतलात आहेत.

लक्षात ठेवा:

  1. समांतर रेषा ह्या न छेदणाऱ्या रेषा असल्या पाहिजेत.
  2. आणि त्या एकाच प्रतलात असल्या पाहिजेत.

Go to top

छेदिका म्हणजे काय?

एखादी रेषा दोन किंवा अधिक रेषांना भिन्न बिंदूंत छेदत असेल तर अशा रेषेला त्या रेषांची छेदिका असं म्हणतात.

छेदिका म्हणजे काय?

छेदिकेमुळे तयार होणारे कोन

छेदिकेमुळे तयार होणारे कोन
संगत कोनआंतर कोनआंतरव्युत्क्रम कोनबाह्यव्युत्क्रम कोन
\angle AMP आणि \angle MNR\angle PMN आणि \angle MNR\angle PMN आणि \angle MNS\angle AMP आणि \angle BNS
\angle PMN आणि \angle RNB\angle QMN आणि \angle MNS\angle QMN आणि \angle MNR\angle AMQ आणि \angle RNB
\angle AMQ आणि \angle MNS   
\angle QMN आणि \angle SNB   
छेदिकेमुळे तयार होणारे कोन

Go to top

समांतर रेषांचे गुणधर्म

संगत कोनव्युत्क्रम कोनआंतर कोन
समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात.समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी एकरूप असतात.समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापंची बेरीज 180 अंश असते.
   
दोन एकप्रतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणारी संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात.दोन एकप्रतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणारी व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात.दोन एकप्रतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणारी आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.
(ज्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्या कोनांना पूरक कोन म्हणतात.)

Go to top

समांतर रेषा व छेदिका यांमुळे तयार होणाऱ्या विविध कोनांतील नातं

समांतर रेषा व छेदिका यांमुळे तयार होणाऱ्या विविध कोनांतील नातं
संगत कोनांच्या जोड्याआंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्याबाह्यव्युत्क्रम कोनांच्या जोड्याआंतरकोनांच्या जोड्या
\angle a = \angle p\angle d = \angle q\angle a = \angle rm\angle d + m\angle p = 180^\circ
\angle b = \angle q\angle c = \angle p\angle b = \angle sm\angle c +m\angle q = 180^\circ
\angle d = \angle s   
\angle c = \angle r   

खालील महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:

  1. इथे \angle a आणि \angle b ह्या दोन कोनांची बेरीज ही  180^\circ असते, कारण (\angle a + \angle b) हा सरळ कोन आहे. वरील आकृतीवर कोनमापक ठेऊन ह्याची खात्री करून घ्या.
  2. त्याच प्रमाणे \angle c आणि \angle d हे देखील सरळ कोन आहेत आणि त्यांची बेरीज देखील 180^\circ आहे.
  3. म्हणजेच \angle a, \angle b, \angle c आणि \angle d ह्यांची बेरीज  360^\circ आहे.
  4. विरुद्ध कोन हे नेहमी एका मापाचे किंवा एकरूप असतात.
    \angle a = \angle c, \angle b = \angle d, \angle p = \angle r आणि \angle q = \angle s
  5. वरील सर्व नियम जसेच्या तसे \angle p, \angle q, \angle r आणि \angle s साठी लागू होतात.

आता आपण बघू की जर आपल्याला ह्यातील एका कोनाचे माप माहित असेल, तर इतर 7 कोनांची मापं आपल्याला काढता येतील का.

उदाहरण:

m\angle d = 60^\circ  असेल तर इतर 7 कोनांची मापं काढा.

आता आपण वरील संगतकोन आणि आंतर व बाह्यव्युत्क्रम कोनांचा तक्ता विचारात घेऊन इतर 7 कोनांची मापं काढूयात,

कोनमापवरील तक्त्याप्रमाणे
d60^\circदिलेला कोन
q60^\circ\angle q=\angle d (आंतरव्युत्क्रम कोन)
s60^\circ\angle s=\angle d (संगत कोन)
b60^\circ\angle b=\angle q (संगत कोन)
a120^\circm\angle a=( 180^\circ-m\angle b)
p120^\circ\angle p=\angle a (संगत कोन)
c120^\circ\angle c=\angle p (आंतरव्युत्क्रम कोन)
r120^\circ\angle r=\angle c (संगत कोन)

आता आपलं उत्तर पडताळून बघू:

(\angle a + \angle b + \angle c + \angle d) = (120^\circ + 60^\circ + 120^\circ + 60^\circ) = 360^\circ

(\angle p + \angle q + \angle r + \angle s)  =   (120^\circ + 60^\circ + 120^\circ + 60^\circ) = 360^\circ

म्हणजे आपल्याला एका कोनाचे माप माहित असेल तर आपण इतर 7 कोनांची मापं काढू शकतो.
तेंव्हा आपण वर शिकलेल्या  संगत कोन, आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्यव्युत्क्रम कोन ह्या संकल्पना एकदम पक्क्या लक्षात ठेवायच्या.


Go to top

समांतर रेषा व छेदिका उदाहरण-1

उत्तर:



शेजारील आकृतीत कोनांची मापं दिलेली आहेत, त्यावरून x ची किंमत काढा.

समांतर रेषा व छेदिका उदाहरण-2

उत्तर:

हे दोन्ही कोन आंतरकोन असल्याने त्यांची बेरीज 180^\circ असते, हे वर दिलेल्या तक्त्यावरून स्पष्ट आहे.

\begin{aligned} \\ & \therefore 2x + 3x = 180 \\ & \therefore 5x = 180 \\ & \therefore x = \frac{180}{5} \\ & \therefore x = 36^\circ\end{aligned}

शेजारील आकृतीत कोनांची मापं दिलेली आहेत, त्यावरून x ची किंमत काढा.

समांतर रेषा व छेदिका उदाहरण-3

उत्तर:

वरील आकृती मध्ये \angle a हा 2x चा विरुद्ध कोन असल्याने m\angle a = 2x.

त्याच प्रमाणे \angle a आणि 4x हे आंतरकोन असल्याने त्यांची बेरीज 180^\circ असते.

\begin{aligned} \\ & \therefore 2x + 4x = 180 \\ & \therefore 6x = 180 \\ & \therefore x = \frac{180}{6} \\ & \therefore x = 30^\circ\end{aligned}

शेजारील आकृतीत m\angle b = 40^\circ आणि m\angle v = 70^\circ आहे, त्यावरून \angle g आणि \angle r ची मापं काढा.

समांतर रेषा व छेदिका उदाहरण-4

उत्तर:

m\angle d=m\angle b=40^\circ (विरुद्ध कोन)
m\angle s = m\angle d = 40^\circ (संगत कोन)
m\angle s + m\angle r = 180^\circ(सरळ कोन)
\begin{aligned} \\ & \therefore m\angle r=180^\circ-m\angle s \\ & \therefore m\angle r=180^\circ-40^\circ \\ & \mathbf{\therefore m\angle r=140^\circ} \end{aligned}
m\angle t = m\angle v = 70^\circ (विरुद्ध कोन)
m\angle g + m\angle t = 180^\circ (आंतर कोन)
\begin{aligned} \\ & \therefore m\angle g = 180^\circ - m\angle t \\ & \therefore m\angle g = 180^\circ - 70^\circ \\ & \mathbf{\therefore m\angle g = 110^\circ}\end{aligned}

शेजारील आकृतीत रेषा m \parallel रेषा n आहे. रेषा j \parallel रेषा k आहे. m\angle b = 80^\circ आहे, त्यावरून \angle f, \angle s आणि \angle u च्या किमती  काढा.

समांतर रेषा व छेदिका उदाहरण-5
कोनाचा प्रकाररेषा m आणि रेषा n मुळे तयार होणारे कोनरेषा j आणि रेषा k मुळे तयार होणारे कोन
संगत कोन\angle a = \angle p
\angle d = \angle s
\angle b = \angle q
\angle c = \angle r
\angle f = \angle t
\angle g = \angle u
\angle e = \angle w
\angle h = \angle v
\angle a = \angle f
\angle b = \angle e
\angle d = \angle g
\angle c = \angle h
\angle p = \angle t
\angle q = \angle w
\angle s = \angle u
\angle r = \angle v
बाह्यव्युत्क्रम कोन\angle a = \angle r
\angle b = \angle s
\angle f = \angle v
\angle e = \angle u
\angle a = \angle h
\angle d = \angle e
\angle p = \angle v
\angle s = \angle w
आंतरव्युत्क्रम कोन\angle d = \angle q
\angle c = \angle p
\angle g = \angle w
\angle h = \angle t
\angle b = \angle g
\angle c = \angle f
\angle q = \angle u
\angle r = \angle t
आंतर कोनm\angle c + m\angle q = 180^\circ
m\angle g +m\angle t = 180^\circ
m\angle c + m\angle g = 180^\circ
m\angle q +m\angle t = 180^\circ
वरील तक्त्याप्रमाणे,
m\angle b = m\angle e (संगत कोन)  
\therefore m\angle e = 80^\circ
\therefore m\angle e + m\angle f = 180^\circ (सरळ कोन)
\begin{aligned} \\ & \therefore m\angle f = 180^\circ - m\angle e \\ & \therefore m\angle f = 180^\circ - 80^\circ \\ & \mathbf{\therefore m\angle f = 100^\circ}\end{aligned}
वरील तक्त्याप्रमाणे,
m\angle b = m\angle q (संगत कोन)  
\therefore m\angle q = 80^\circ
m\angle s = m\angle q (विरुद्ध कोन)
\mathbf{\therefore m\angle s = 80^\circ}
वरील तक्त्याप्रमाणे m\angle u = m\angle s (संगत कोन)
\mathbf{\therefore m\angle u = 80^\circ}

शेजारील आकृतीत रेषा k ही छेदिका आहे.
m\angle a =105^\circ  आहे, त्यावरून \angle d, \angle f आणि \angle h ची मापं काढा.

समांतर रेषा व छेदिका उदाहरण-6
m\angle c = m\angle a (विरुद्ध कोन)
\therefore m\angle c= 105^\circ
\therefore m\angle c + m\angle d = 180^\circ (सरळ कोन)
\begin{aligned} \\ & \therefore m\angle d = 180^\circ - m\angle c \\ & \therefore m\angle d=180^\circ - 105^\circ \\ & \mathbf{\mathbf{\therefore m\angle d = 75^\circ}}\end{aligned}
m\angle f = m\angle a (संगत कोन)  
\mathbf{\therefore m\angle f = 105^\circ}
m\angle h = m\angle f (विरुद्ध कोन)
\mathbf{\therefore m\angle u = 105^\circ}

शेजारील आकृतीत रेषा m \parallel रेषा k \parallel रेषा n, तर दिलेल्या मापांवरून \angle BCE म्हणजेच \angle x चं माप काढा.

समांतर रेषा व छेदिका उदाहरण-7

Go to top

दिलेल्या रेषेला जर समांतर रेषा काढायची असेल तर ती कशी काढायची, त्याच्या काही पद्धती आपण बघुयात.

पद्धत: 1

दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे
  1. एक रेषा काढा आणि तिला L नाव द्या.
  2. L रेषेवर काही अंतरावर A हा एक बिंदू घ्या.
  3. आता तुमच्या कंपासपेटीत असलेला एक गुण्या (गुण्या 1) घ्या आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याची काटकोन करणारी बाजू AB रेषा L बरोबर अशा प्रकारे जुळवा की त्या गुण्याचा काटकोन करणारा कोपरा बिंदू A वर असेल.
  4. आता तुमच्या कंपासपेटीत असलेला दुसरा गुण्या (गुण्या 2) घ्या आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याची काटकोन करणारी बाजू PQ गुण्या 1 च्या काटकोन करणाऱ्या बाजू AC ला जुळवून घ्या. आता गुण्या 2 चा काटकोन करणारा कोपरा गुण्या 1 च्या काटकोन करणाऱ्या बाजूला जिथे स्पर्श करत आहे, त्या बिंदुला P नाव द्या.
  5. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे P बिंदूतून जाणारी आणि गुण्या 2 च्या काटकोन करणाऱ्या बाजू PR ला स्पर्श करणारी रेषा M काढा.
  6. अशा प्रकारे दिलेल्या L रेषेला M ही समांतर रेषा काढता येते.

दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे पद्धत 2
  1. वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे m ही एक रेषा काढा.
  2. m ह्या रेषेवर काही अंतर सोडून A आणि B हे दोन बिंदू काढा.
  3. A ह्या बिंदूवर AP आणि B ह्या बिंदूवर BQ हे दोन लंब असे काढा की \ell(AP) = \ell(BQ).
  4. आता P आणि Q बिंदूंमधून जाणारी n ही रेषा काढा.
  5. अशा प्रकारे m आणि n ह्या समांतर रेषा आहेत.

दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे पद्धत 3
  1. वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे m ही एक रेषा काढा.
  2. m ह्या रेषेवर काही अंतर सोडून A आणि B हे दोन बिंदू काढा.
  3. A आणि B दोन्ही बिंदूंवर दोन लंब काढा.
  4. A वर काढलेल्या लंबावर 3 सेमी अंतरावर P हा बिंदू घ्या आणि B वर काढलेल्या लंबावर 3 सेमी अंतरावर Q हा बिंदू घ्या. 
  5. आता P आणि Q बिंदूंमधून जाणारी n रेषा काढा
  6. अशा प्रकारे m आणि n ह्या समांतर रेषा आहेत.

Go to top

इयत्ता 8 वीचे पाठयपुस्तक: इथे क्लिक करा

You cannot copy content of this page

error: Content is protected !!
Scroll to Top