इयत्ता 8 वी घन आणि घनमूळ म्हणजे काय?

इयत्ता 8 वी घन आणि घनमूळ म्हणजे काय?

घातांक म्हणजे काय?

खालील उदाहरणांवरून समजावून घेऊयात …
2\times2 = 4 म्हणजेच 2^2 (दोनचा वर्ग)
2\times2\times2 = 8 म्हणजेच 2^3 (दोनचा घन)
2\times2\times2\times2 = 16 म्हणजेच 2^4 (दोनचा चौथा घात)
वरील संख्यांमध्ये 2 ला ‘पाया’ म्हणतात आणि 2 च्या डोक्यावरील संख्येला ‘घातांक’ म्हणतात.


Go to top

1 \mathbf{a^m \times a^n=a^{m+n}}
2 \mathbf{a^m \div a^n=a^{m-n}}
3 \mathbf{(a \times b)^m=a^m \times b^m}
4\mathbf{a^0=1}
5 \mathbf{a^{-m}=\frac{1}{a^m}}
6 \mathbf{(a^m)^n=a^{mn}}
7\mathbf{\left(\frac{a}{b}\right)^{m}=\frac{a^m}{b^m}}
8 \mathbf{\left(\frac{a}{b}\right)^{-m}=\left(\frac{b}{a}\right)^{m}}

आता वरील नियम वापरून आपण काही उदाहरणं सोडवून बघुयात,

उदाहरण 1:
3^{3} \times 3^{2}=?
उत्तर:
वरील नियम 1 प्रमाणे …
\begin{aligned} \\ \therefore 3^{3} \times 3^{2}&=3^{(3+2)} \\ &=3^{5} \\ &=243\end{aligned}
उदाहरण 6:
6^{1}=?
उत्तर:
\therefore 6^{1}=6
उदाहरण 2:
3^{7} \div 3^{4}=?
उत्तर:
वरील नियम 2 प्रमाणे …
\begin{aligned} \\ \therefore 3^{7} \div 3^{4}&=3^{(7-4)} \\ &=3^{3} \\ &=27\end{aligned}
उदाहरण 7:
(3 \times 2)^{3}=?
उत्तर:
वरील नियम 3 प्रमाणे …
\begin{aligned} \\ \therefore (3 \times 2)^{3}&=3^{3} \times 2^{3} \\ &=27 \times 8 \\ &=216\end{aligned}
उदाहरण 3:
(3^{3})^{2}=?
उत्तर:
वरील नियम 6 प्रमाणे …
\begin{aligned} \\ \therefore (3^{3})^{2}&=3^{(3 \times 2)} \\ &=3^{6} \\ &=729\end{aligned}
उदाहरण 8:
\left(\frac{3}{5}\right)^{2}=?
उत्तर:
वरील नियम 7 प्रमाणे …
\begin{aligned} \\ \therefore \left(\frac{3}{5}\right)^{2}&=\frac{3^{2}}{5^{2}} \\ &=\frac{9}{25} \\ &=0.36\end{aligned}
उदाहरण 4:
2^{-4}=?
उत्तर:
वरील नियम 5 प्रमाणे …
\begin{aligned} \\ \therefore 2^{-4}&=\frac{1}{2^{4}} \\ &=\frac{1}{16} \\ &=0.0625\end{aligned}
उदाहरण 9:
\left(\frac{3}{5}\right)^{-2}=?
उत्तर:
वरील नियम 8 प्रमाणे …
\begin{aligned} \\ \therefore \left(\frac{3}{5}\right)^{-2}&=\frac{5^{2}}{3^{2}} \\ &=\frac{25}{9} \\ &=2.78\end{aligned}
उदाहरण 5:
7^{0}=?
उत्तर:
वरील नियम 4 प्रमाणे …
\therefore 7^{0}=1

Go to top

§ एखाद्या संख्येचा घातांक जर परिमेय संख्या असेल, म्हणजेच \frac{1}{7} ह्या स्वरूपात असेल तर त्याचा अर्थ काय होतो , ते आता पाहू.

एखाद्या संख्येचा वर्ग आपण 7^{2} असा दर्शवतो आणि त्याचे वर्गमूळ आपण घातांकाच्या स्वरूपात 7^\frac{1}{2} असे दर्शवतो. तसेच एखाद्या संख्येचा घन आपण 7^{3} असा दर्शवतो आणि त्याचे घातांकाच्या स्वरूपात घनमूळ  आपण 7^\frac{1}{3} असे दर्शवतो.

आपण आता खाली दिलेली काही उदाहरणं बघू, म्हणजे तुम्हाला ही संकल्पना पूर्णपणे समजेल,

अनुक्रमांकघातांकमूळ घातांक स्वरूपातमूळ करणी चिन्ह वापरून
17^{2}7^\frac{1}{2}\sqrt{7}
25^{3}5^\frac{1}{3}\sqrt[3]{5}
39^{8}9^\frac{1}{8}\sqrt[8]{9}
412^{90}12^\frac{1}{90}\sqrt[90]{12}
महत्वाचं: वरील उदाहरणांमध्ये x^\frac{1}{n} आणि \sqrt[n]{x}  या दोन्हींचा अर्थ x चे n वे मूळ असाच होतो;  फक्त x चे n वे मूळ दर्शवण्याच्या ह्या दोन पद्धती आहेत.

खालील संख्यांची मूळ x^\frac{1}{n} आणि \sqrt[n]{x} ह्या स्वरूपात लिहा.

अनुक्रमांकप्रश्नमूळ घातांक स्वरूपातमूळ करणी चिन्ह वापरून
115 चे पाचवे मूळ15^\frac{1}{5}\sqrt[5]{15}
210 चे सहावे मूळ10^\frac{1}{6}\sqrt[6]{10}
3625 चे वर्गमूळ25^\frac{1}{2}\sqrt{625}
49 चे घनमूळ9^\frac{1}{3}\sqrt[3]{9}
5100 चे सातवे मूळ100^\frac{1}{7}\sqrt[7]{100}
640 चे आठवे मूळ40^\frac{1}{8}\sqrt[8]{40}

उदाहरण:

अनुक्रमांकघातांकित संख्यामूळ
1(64)^{\frac{1}{5}}64 चे 5 वे मूळ
2(30)^{\frac{1}{7}}30 चे 7 वे मूळ
3(50)^{\frac{1}{4}}50 चे 4 थे मूळ
4(100)^{\frac{1}{9}}100 चे 9 वे मूळ
5(15)^{\frac{1}{12}}15 चे 12 वे मूळ

एखाद्या संख्येचा घातांक जर परिमेय संख्या असेल, म्हणजेच \mathbf{\frac{m}{n}} ह्या स्वरूपात असेल तर त्याचा अर्थ काय होतो , ते आता पाहू.

आपण एका उदाहरणाने हे समजावून घेऊयात,

उदाहरण:

आता आपण 64 चं घनमूळ काढू,

\sqrt[3]{64}=(64)^{\frac{1}{3}}

पण 64 हा 8 चा वर्ग आहे (8^{2}=64).

\therefore (8^{2})^{\frac{1}{3}}  म्हणजेच 8 च्या वर्गाचे घनमूळ.

\therefore (64)^{\frac{1}{3}}=4 ——- (i)

तसेच आता 8 च्या घनमूळाचा वर्ग काढू,

\therefore (8^{\frac{1}{3}})^{2}=(2)^{2}

\therefore (8^{\frac{1}{3}})^{2} = 4 ——- (ii)

म्हणजेच (8 च्या वर्गाचे घनमूळ) = (8 च्या घनमुळाचा वर्ग)

महत्वाचे: घातांक पूर्णांक संख्या असतानाचे सर्व नियम घातांक परिमेय संख्या असेल तरी लागू होतात. 

उदाहरण:

(x^{m})^{n} = x^{mn} वापरून,
(8^{2})^{\frac{1}{3}} = (8^{\frac{1}{3}})^{2}
\therefore (8^{2})^{\frac{1}{3}}=(8)^{\frac{2}{3}}
(8)^{\frac{2}{3}}=(8^{2})^{\frac{1}{3}} म्हणजे 8 च्या वर्गाचे घनमूळ.
(8^{\frac{2}{3}})=(8^{\frac{1}{3}})^{2} म्हणजे 8 च्या घनमुळाचा वर्ग.

महत्वाचे:  
(x)^{\frac{m}{n}}=(x^{m})^{\frac{1}{n}}  म्हणजे x च्या m व्या घाताचे n वे मूळ.
(x)^{\frac{m}{n}}=(x^{\frac{1}{n}})^{m}  म्हणजे x च्या n व्या मुळाचा m वा घात.

आता आपण ह्याची काही उदाहरणं बघुयात,

अनुक्रमांकसंख्याकितव्या मुळाचा कितवा घातकितव्या घाताचे कितवे मूळ
1(225)^{\frac{2}{3}}225 च्या घनमूळाचा वर्ग225 च्या वर्गाचे घनमूळ
2(45)^{\frac{4}{5}}45 च्या 5 व्या मूळचा 4 था घात45 च्या 4 थ्या घाताचे 5 वे मूळ
3(81)^{\frac{6}{7}}81 च्या 7 व्या मूळचा 6 वा घात81 च्या 6 व्या घाताचे 7 वे मूळ
4(100)^{\frac{4}{10}}100 च्या 10 व्या मूळचा 4 था घात100 च्या 4 थ्या घाताचे 10 वे मूळ
5(21)^{\frac{3}{7}}21 च्या 7 व्या मूळचा घन21 च्या घनाचे 7 वे मूळ

आता आपण वर केलेल्या उदाहरणांच्या बरोबर उलटी क्रिया करून केलेली उदाहरणं बघुयात,

अनुक्रमांककितव्या घाताचे कितवे मूळसंख्या
1121 च्या पाचव्या घाताचे वर्गमूळ(121)^{\frac{5}{2}}
2324 च्या चौथ्या मुळाचा घन(324)^{\frac{3}{4}}
3264 च्या वर्गाचे पाचवे मूळ(264)^{\frac{2}{5}}
43 च्या घनमुळाचा घन(3)^{\frac{3}{3}}
आपल्याला माहित आहे की दोन धन संख्यांचा गुणाकार हा धन संख्याच असतो.
उदाहरण: 2 x 2 = 4
आणि आपल्याला हे ही माहित आहे की दोन ऋण संख्यांचा गुणाकारही धन संख्याच असतो.
उदाहरण:  (-2) x (-2) = 4
आता हे पक्क लक्षात ठेवायचं:
2 x 2 = 4 म्हणजे 2 चा वर्ग आणि (-2) x (-2) = 4 हा सुद्धा 2 चा वर्गच आहे. म्हणजेच 4 ह्या धन संख्येला दोन वर्गमुळे असतात; एक +2 आणि दुसरे -2.

प्रत्येक धन संख्येला दोन वर्गमुळे असतात; त्यातले एक वर्गमूळ धन असते आणि दुसरे ऋण असते.

x धन संख्येचे धन वर्गमूळ \sqrt{x} असे  दर्शवतात आणि त्याच धन संख्येचे ऋण वर्गमूळ -\sqrt{x} असे दर्शवतात.
उदाहरण: \sqrt{4}=2 आणि -\sqrt{4}=-2.

शून्य या संख्येचे वर्गमूळ शून्यच असते.

Go to top

आपल्याला एखाद्या संख्येचा वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय ते माहित आहे.
आपण निवडलेल्या संख्येला त्याच संख्येने एकदा गुणले की आपल्याला त्या संख्येचा वर्ग मिळतो.
उदाहरण:
2 चा वर्ग = 2\times 2 = 4 आहे
4 चा वर्ग = 4\times 4 = 16 आहे
5 चा वर्ग = 5\times 5 = 25 आहे.
-2 चा वर्ग = -2\times -2 = 4 आहे.

महत्वाचे: धन आणि ऋण दोन्ही संख्यांचा वर्ग हा नेहमी धन असतो.

Go to top

त्याच प्रमाणे आपण निवडलेल्या संख्येला त्याच संख्येने दोन वेळा गुणले की आपल्याला त्या संख्येचा घन मिळतो.

उदाहरण:

2 चा घन = 2\times 2\times 2 = 8
3 चा घन = 3\times 3\times 3 = 27
5 चा घन = 5\times 5\times 5 = 125

महत्वाचे: जर संख्या ऋण असेल तर? आपल्याला माहित आहे की तीन ऋण संख्यांचा गुणाकार हा ऋण असतो; म्हणून ऋण संख्येचा घनही ऋण असतो.

उदाहरण:

-2 चा घन = -2 x -2 x -2 = -8

-3 चा घन  = -3 x -3 x -3 = -27

आता आपण अजून काही उदाहरणं सोडवुया,

उदाहरण 1:
19 चा घन काढा.
उत्तर:
\begin{aligned} \\ \therefore 19^{3}&={19\times 19\times 19} \\ &=6859\end{aligned}


उदाहरण 2:
-15 चा घन काढा.
उत्तर:
\begin{aligned} \\ -15^{3}&={-15\times-15\times-15} \\ &=(225)\times-15 \\ &=-3375\end{aligned}


उदाहरण 3:
\frac{2}{3} चा घन काढा.
उत्तर:
\begin{aligned} \\ \left(\frac{2}{3}\right)^3&=\frac{2^3}{3^3} \\ &= \frac{2\times2\times2}{3\times3\times3} \\ &= \frac{8}{27} \\ &= 0.296\end{aligned}


उदाहरण 4:
1.4 चा घन काढा.
उत्तर:
\begin{aligned} \\ 1.4^{3}&={1.4\times1.4\times1.4} \\ &= 2.744 \end{aligned}


उदाहरण 5:
0.03 चा घन काढा.
उत्तर:
\begin{aligned} \\ (0.03)^{3}&={(0.03)\times(0.03)\times(0.03)} \\ &= 0.000027\end{aligned}

ह्यात एक लक्षात घ्या की (0.03) ह्या संख्येत दशांश चिन्हानंतर असलेल्या अंकांची संख्या दोन आहे. म्हणजेच एक संख्या आहे 0 आणि दुसरी आहे 3.

आपण घन काढताना (0.03) ही संख्या त्याच संख्येला दोन वेळा गुणत आहोत. म्हणजेच (0.03)\times(0.03)\times(0.03) आणि त्यामुळे उत्तरात ह्या प्रत्येक पदातील दशांश चिन्हानंतरच्या अंकांच्या संख्यांची बेरीज होते. ह्या उत्तरात दशांश चिन्हानंतर एकूण 6 अंक आहेत. हे 6 अंक म्हणजे प्रत्येक पदातील दशांश चिन्हानंतरच्या 03 = 2 अंक ह्या प्रमाणे 2 + 2 + 2 = 6 अंक आहेत.


Go to top

घनमूळ कसं काढायचं, ते आता आपण काही उदाहरणांच्या साह्याने समजावून घेऊयात.

उदाहरण 1:
64 चं घनमूळ काढा.
उत्तर:
आधी आपण 64 चे मूळ अवयव पाडू; म्हणजेच 64 ला पूर्ण भाग जाईपर्यंत भागू,

 भाजकभागाकार
264
232
216
28
24
22
 1
64 चे मूळ अवयव

\therefore \sqrt[3]{64}=2\times2\times2\times2\times2\times2
म्हणजेच 2 ने 64 ला 8 वेळा भागलं की पूर्ण भाग जातो आणि म्हणून,
\left(2\times2\times2\times2\times2\times2\right) हे 64 चे मूळ अवयव आहेत.

\therefore \sqrt[3]{64}=(2\times2)\times(2\times2)\times(2\times2)

अशा प्रकारे (2\times2) चे 3 संच तयार होतात.

\begin{aligned} \\ \sqrt[3]{64}&=4\times4\times4 \\ &= (4^3)^\frac{1}{3} \\ &=4\end{aligned}

म्हणून 64 चं घनमूळ 4 आहे.


उदाहरण 2:
-1331 चे घनमूळ काढा.
उत्तर:
आधी आपण -1331 चे मूळ अवयव पाडू; म्हणजेच -1331 ला पूर्ण भाग जाईपर्यंत भागू,

 भाजकभागाकार
11-1331
11-121
11-11
-1
-1331 चे मूळ अवयव
\therefore \sqrt[3]{-1331}=-11\times-11\times-11

म्हणजेच -11 ने -1331 ला 3 वेळा भागलं की पूर्ण भाग जातो आणि म्हणून (-11\times-11\times-11) हे -1331 चे मूळ अवयव आहेत.

\begin{aligned} \\ \therefore \sqrt[3]{-1331}&=-11\times-11\times-11 \\ &= (-11^3)^\frac{1}{3} \\ &= -11\end{aligned}

म्हणून -1331 चं घनमूळ -11 आहे.


उदाहरण 3:

0.125 चे घनमूळ काढा.

उत्तर:

आपण हे गणित आधी सोपं करून घेऊ,

\begin{aligned} \\ \sqrt[3]{0.125}&=\sqrt[3]{\frac{125}{1000}} \\ \therefore \sqrt[3]{0.125}&=\frac{\sqrt[3]{125}}{\sqrt[3]{1000}}\end{aligned}

आधी आपण 125 आणि 1000 चे मूळ अवयव पाडू,

 भाजकभागाकार
5125
525
55
1
125 चे मूळ अवयव
\therefore \sqrt[3]{125}=5\times5\times5

म्हणजेच 5 ने 125 ला 3 वेळा भागलं की पूर्ण भाग जातो आणि म्हणून (5\times5\times5) हे 125 चे मूळ अवयव आहेत.\begin{aligned} \\ \therefore \sqrt[3]{125}&=5\times5\times5 \\ &= (5^3)^\frac{1}{3} \\ &= 5\end{aligned}
म्हणून 125 चं घनमूळ 5 आहे.

 भाजकभागाकार
101000
10100
1010
1
1000 चे मूळ अवयव
\therefore \sqrt[3]{1000} = 10\times10\times10

म्हणजेच 10 ने 1000 ला 3 वेळा भागलं की पूर्ण भाग जातो आणि म्हणून (10\times10\times10) हे 1000 चे मूळ अवयव आहेत.
\begin{aligned} \\ \therefore \sqrt[3]{1000}&=10\times10\times10 \\ &=(10^3)^\frac{1}{3} \\ &= 10\end{aligned}
म्हणून 1000 चं घनमूळ 10 आहे.

\sqrt[3]{0125}=\frac{5}{10}=0.5

म्हणून 0.125 चं घनमूळ 0.5 आहे.


Go to top

खालील संख्यांचे घनमूळ काढा.

उदाहरण 1:
\sqrt[3]{8000}

58000
51600
5320
464
416
44
 1
\begin{aligned} \\ \therefore \sqrt[3]{8000}=&(5\times 5\times 5)\times \\ &(3\times 3\times 3) \\ =&(5^{3}\times 4^{3})^\frac{1}{3} \\ =&\;5\times 4 \\ =&\;20\end{aligned}

उदाहरण 2:

\sqrt[3]{729}
3729
3243
381
327
39
33
 1
\begin{aligned} \\ \sqrt[3]{729}=&(3\times 3\times 3)\times \\ &(3\times 3\times 3) \\ =&(3^{3}\times 3^{3})^\frac{1}{3} \\ =&\;3\times 3 \\ =&\;9\end{aligned}

उदाहरण 3:

\sqrt[3]{343}
7343
749
77
1
\begin{aligned} \\ \sqrt[3]{343}&=7\times 7\times 7 \\ &=(7^{3})^\frac{1}{3} \\ &=\;7\end{aligned}

उदाहरण 4:

\sqrt[3]{-512}
2-512
2-256
2-128
2-64
2-32
2-16
2-8
2-4
2-2
-1
\begin{aligned} \\ \sqrt[3]{-512}=-&[(2\times 2\times 2)\times \\ &(2\times 2\times 2) \times \\ &(2\times 2\times 2)] \\ =-&(2^{3}\times 2^{3}\times 2^{3})^\frac{1}{3} \\ =-&(2\times 2\times 2) \\ =-&\;8\end{aligned}

उदाहरण 5

\sqrt[3]{-2744}
2-2744
2-1372
2-686
7-343
7-49
7-7
-1
\begin{aligned} \\ \sqrt[3]{-2744}= -[&(2\times 2\times 2)\times \\ &(7\times 7\times 7)] \\ =\;-&(2^{3}\times 7^{3}\times)^\frac{1}{3} \\ =\;-&(2\times 7) \\ =\;-&14\end{aligned}

उदाहरण 6:

\sqrt[3]{32768}
232768
216384
28192
24096
22048
21024
2512
2256
2128
264
232
216
28
24
22
1
\begin{aligned} \\ \sqrt[3]{32768}=&(2\times 2\times 2)\times \\ &(2\times 2\times 2)\times \\ &(2\times 2\times 2)\times \\ &(2\times 2\times 2)\times \\ &(2\times 2\times 2) \\ =&(2^{3}\times 2^{3}\times 2^{3}\times \\ &\;2^{3}\times 2^{3}\times)^\frac{1}{3} \\ =&(2\times 2\times 2\times 2\times 2) \\ =&\;32\end{aligned}

उदाहरण 7:

\sqrt[3]{\frac{16}{54}}

आता आपण 16 आणि 54 यांचे मूळ अवयव आधी पाडून घेऊ,

216
28
24
2
1
\sqrt[3]{16}=2\times 2\times 2\times 2
254
327
39
33
1
\sqrt[3]{54}=2\times 3\times 3\times 3

\begin{aligned} \\ \sqrt[3]{\frac{16}{54}}&=\left(\frac{\cancel{2}\times 2\times 2\times 2}{\cancel{2}\times 3\times 3\times 3}\right)^{\frac{1}{3}} \\ &=\left(\frac{2^{3}}{3^{3}} \right)^{\frac{1}{3}} \\ &=\frac{2}{3} \\ &=0.\dot{6}\end{aligned}


उदाहरण 8:

\sqrt[3]{\frac{27}{125}}

आता आपण 27 आणि 125 यांचे मूळ अवयव आधी पाडून घेऊ,

327
39
33
1
\sqrt[3]{27}=3\times 3\times 3
5125
525
55
1
\sqrt[3]{125}=5\times 5\times 5

\begin{aligned} \\ \sqrt[3]{\frac{27}{125}}&=\left(\frac{3\times 3\times 3}{5\times 5\times 5}\right)^\frac{1}{3} \\ &= \left(\frac{3^{3}}{5^{3}} \right)^{\frac{1}{3}} \\ &= \frac{3}{5} \\ &= 0.6 \end{aligned}


Go to top

इयत्ता 8 वीचे पाठयपुस्तक: इथे क्लिक करा

You cannot copy content of this page

error: Content is protected !!
Scroll to Top