इयत्ता 8 वी सूट व कमिशन म्हणजे काय? : सूट व कमिशन म्हणजे व्यापारातील सवलती आणि मध्यस्थांना दिले जाणारे प्रोत्साहन. व्यवसायात विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना सूट दिली जाते, तर दलाल किंवा वितरकांना कमिशन स्वरूपात प्रोत्साहन दिले जाते. हे दोन्ही घटक व्यवसायातील नफा आणि विपणन धोरणांवर प्रभाव टाकतात.

विक्रीची साखळी
इयत्ता 8 वी सूट व कमिशन म्हणजे काय? हे शिकण्याआधी आपण एखाद्या वस्तूची विक्रीची साखळी कशी असते ते उदाहरणासहित समजावून घेऊयात.
उत्पादक ते दुकानदार :
१) एक उत्पादक आपले स्वतःकडचे पैसे खर्च करून (भांडवल घालून) आपल्या कारखान्यात एक सायकल तयार करतो. समजा त्याला ती सायकल तयार करायला रु. 10,000/- खर्च आला. ह्या रु. 10,000/- खर्चाला उत्पादन खर्च म्हणतात.
उत्पादन खर्च = रु. 10,000/-
२) आता उत्पादकाला ती सायकल बाजारात विकायची असते आणि त्यावर नफा कमवायचा असतो; म्हणून तो ती सायकल एका सायकलच्या दुकानात विकण्यासाठी घेऊन जातो. सायकलच्या दुकानदाराला उत्पादक त्या सायकलची किंमत रु. 10,500/- सांगतो. ह्या किमतीला वस्तूची “मूळ किंमत” म्हणतात.
वस्तूची मूळ किंमत = उत्पादनाचा खर्च (रु. 10,000/- ) + उत्पादकाचा नफा (रु. 500/-).
३) दुकानदार ती सायकल रु. 10,500/- देऊन उत्पादकाकडून विकत घेतो. अशा प्रकारे उत्पादक रु. 500/- नफा कमावतो.
ही झाली वस्तूच्या विक्री साखळीतील पहिली पायरी; जिथे उत्पादक आपल्या कारखान्यात आपल्या पैशाने (भांडवलाने) वस्तू तयार करतो आणि ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी दुकान मालकाला मूळकिंमतीला विकत देतो आणि आपला नफा कमावतो.
दुकानदार ते ग्राहक :
आता वस्तूच्या विक्री साखळीतील दुसऱ्या पायरीत दुकानदाराला ती वस्तू ग्राहकाला विकून आपला नफा कमवायचा असतो.
1) त्यासाठी दुकानदार ग्राहकाला ह्या सायकलची किंमत रु. 11,000/- सांगतो; ह्या किमतीला वस्तूची “छापील किंमत” किंवा “विक्री किंमत” म्हणतात.
वस्तूची छापील किंमत (रु. 11,000/-) = वस्तूची मूळ किंमत (रु. 10,500/-) + दुकानदाराचा नफा (रु. 500/-).
2) ग्राहक दुकानदाराकडून छापील किमतीला (रु. 11,000/-) सायकल विकत घेतो आणि हा व्यवहार पूर्ण होतो; म्हणजेच वस्तूच्या विक्रीची साखळी इथे पूर्ण होते.

सूट म्हणजे काय?
दुकानदार वस्तूच्या “छापील किमती”पेक्षा जेवढी रक्कम ग्राहकाकडून कमी घेतो, त्या रकमेला “सूट” म्हणतात.
उदाहरणार्थ, एका सायकलची “छापील किंमत” रु. 10,000/- आहे आणि ती सायकल दुकानदाराने ग्राहकाला रु. 9,800/- ला विकली, तर दुकानदाराने ग्राहकाला रु. 200/- ची “सूट” दिली असं म्हणतात.
सुटीचा दर शतमानात किंवा शेकडेवारीत किंवा टक्केवारीत व्यक्त केला जातो.
उदाहरणार्थ सणासुदीच्या दिवसात आपण अनेक दुकानांवर सेलचे किंवा डिस्काऊन्टचे (सूट) फलक बघतो. ह्या फलकांवर 20% सूट, 50% सूट असं लिहिलेलं आपण अनेक वेळा पाहिलं असेल.
आता शेकडेवारीत सूट व्यक्त करायची म्हणजे नेमकं काय; तर समजा एखाद्या वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे आणि दुकानदाराने ती वस्तू आपल्याला 80 रुपयांना विकली तर याचा अर्थ दुकानदाराने आपल्याला 20 रुपयांची, म्हणजेच 20% सूट दिली, असा अर्थ होतो.
आपण आणखीन काही उदाहरणं बघूयात,
उदाहरण:
जर एका वहीची छापील किंमत 30 रुपये आहे आणि दुकानदाराने ती वही आपल्याला 25 रुपये 50 पैशांना विकली तर दुकानदाराने आपल्याला किती टक्के सूट दिली?
उत्तर:
वहीची छापील किंमत 30 रुपये आहे आणि दुकानदाराने आपल्याला ती 25 रुपये 50 पैशांना विकली आहे; म्हणजेच दुकानदाराने (30 – 25.5) = 4.5 रुपयांची (4 रुपये 50 पैसे) सूट दिलेली आहे.
\blacktriangleright आता शेकडेवारीत किती सूट दिली ते काढू,
30 रुपयांना 4 रुपये 50 पैसे, म्हणजे 4.5 रुपये सूट दिली आहे, तर वहीची किंमत 100 रुपये असती तर किती सूट मिळाली असती?
\therefore \left(\frac{100}{30} \times 4.5\right)=3.33 \times 4.5=15\% म्हणजेच दुकानदाराने 15 टक्के सूट दिली आहे.
उदाहरण:
जर एका क्रिकेट बॅटची छापील किंमत 1500 रुपये असेल आणि दुकानदाराने आपल्याला त्यावर 7% सूट दिली तर आपल्याला किती पैसे दुकानदाराला द्यावे लागतील?
उत्तर:
क्रिकेट बॅटची छापील किंमत 1500 रुपये आहे आणि दुकानदाराने आपल्याला त्यावर 7% सूट दिली आहे.
म्हणजे 100 रुपयांना 7 टक्के सूट, तर 1500 रुपयांवर किती सूट मिळेल?
\therefore \frac{1500}{100} \times 7=105 रुपये सूट मिळेल.
म्हणजेच दुकानदाराला आपल्याला (1500 – 105) = 1395 रुपये द्यावे लागतील.

सुटीची उदाहरणं
उदाहरण 1:
360 रुपये छापील किंमत असलेलं पुस्तक जर दुकानदाराने आपल्याला 306 रुपयांना विकलं तर दुकानदाराने आपल्याला किती सूट दिली?
उत्तर:
पुस्तकाची छापील किंमत = 360 रुपये
प्रत्यक्ष विक्रीची किंमत = 306 रुपये
म्हणजेच दुकानदाराने (360 – 306) = 54 रुपयांची सूट दिलेली आहे.
360 रुपये छापील किमतीवर 54 रुपये सूट दिली आहे; जर पुस्तकाची किंमत 100 रुपये असती तर किती सूट मिळाली असती?
\therefore \frac{100}{360} \times 54=(0.27) \times 54 = 15\%
म्हणजेच दुकानदाराने 15% सूट दिलेली आहे.
उदाहरण 2:
1200 रुपये छापील किंमत असलेल्या खुर्चीवर दुकानदाराने 10% सूट दिली, तर एकूण किती रुपयांची सूट मिळाली? खुर्चीची विक्री किती रुपयांना झाली?
उत्तर:
खुर्चीची छापील किंमत 1200 रुपये आहे.
दुकानदाराने खुर्चीच्या छापील किमतीवर 10% सूट दिलेली आहे.
\therefore 1200 \times \frac{10}{100}=120
म्हणजेच दुकानदाराने एकूण १२० रुपयांची सूट दिलेली आहे.
म्हणून विक्रीची किंमत = (1200 – 120) = 1080 रुपये.
उदाहरण 3:
दुकानदाराने छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली, तर त्या साडीची छापील किंमत किती होती?
उत्तर:
लक्षात घ्या की इथे साडीच्या विक्रीची किंमत 1120 रुपये आहे; म्हणजेच साडी विकत घेण्यासाठी ग्राहकाने दुकानदाराला एकूण 1120 रुपये दिलेले आहेत.
दुकानदाराने साडीच्या छापील किमतीवर 20% सूट दिली आहे; म्हणजे जर साडीची छापील किंमत 100 रुपये असेल तर त्यावर 20 रुपये सूट दिली आहे. याचा अर्थ ग्राहकाला फक्त (100 – 20) = 80 रुपये दुकानदाराला द्यावे लागणार आहेत.
जर साडीची विक्रीची किंमत 80 रुपये असताना साडीची छापील किंमत 100 रुपये आहे, तर साडीची विक्रीची किंमत 1120 रुपये असताना साडीची छापील किंमत किती?
\therefore \frac{1120}{80} \times 100=14 \times 100=1400 रुपये.
म्हणजेच साडीची छापील किंमत 1400 रुपये होती.
उदाहरण 4:
एक दुकानदार एका वस्तूची किंमत, त्या वस्तूच्या छापील किमतीपेक्षा 30% वाढवून ग्राहकाला सांगतो. पण ग्राहकाकडून वस्तूची वाढीव किंमत घेताना त्यावर 20% सूट देतो. तर दुकानदाराला त्याने छापील किमतीच्या ३०% वाढवून ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के जास्त रक्कम मिळते?
उत्तर:
इथे लक्षात घ्या की आपल्याला ह्या उदाहरणात वस्तूची छापील किंमत आणि विक्री किंमत, दोन्हीही माहित नाहीये.
दुकानदाराने वस्तूची विक्री किंमत छापील किमतीपेक्षा 30 टक्क्यांनी वाढवली आहे आणि ग्राहकाला त्या वाढीव विक्री किमतीवर 20 टक्के सूट दिली आहे.
जर वस्तूची छापील किंमत 100 रुपये असेल तर दुकानदाराने ती छापील किंमत 30 टक्क्यांनी वाढवली आहे. म्हणजेच (100 + 30) = 130 रुपये.
आणि ह्या 130 रुपयांवर दुकानदाराने ग्राहकाला 20 टक्के सूट दिली आहे.
म्हणजे 100 रुपये किमतीवर 20 रुपये सूट, तर 130 रुपये किमतीवर किती?
\left(\frac{130}{100}\right) \times 20=26 रुपये.
म्हणजे विक्री किंमत = 130 – 26 = 104 रुपये.
जर दुकानदाराने वाढवलेली किंमत 100 रुपये असेल, तर दुकानदाराला 104 रुपये मिळाले; म्हणजेच दुकानदाराला ह्या व्यवहारात 4% अधिक रक्कम मिळाली.
उदाहरण 5:
1750 रुपये छापील किंमत असलेल्या एका वस्तूवर ग्राहकाला 8% सूट देऊनही दुकानदाराला 15% नफा होतो, तर ती वस्तू दुकानदाराने कोणत्या किमतीला खरेदी केली असेल?
उत्तर:
इथे लक्षात घ्या की आपल्याला दुकानदाराने उत्पादकाकडून कोणत्या किमतीला वस्तू खरेदी केली असेल, ते काढायचे आहे; म्हणजेच आपल्याला वस्तूची मूळ किंमत काढायची आहे.
वस्तूची छापील किंमत = 1750 रुपये आहे.
दुकानदाराने ग्राहकाला 8% सूट देऊन वस्तू विकली; म्हणजे दिलेली सूट =1750 \times \frac{8}{100}=1750 \times 0.08=140 रुपये.
\therefore म्हणजे विक्री किंमत = 1750 – 140 = 1610 रुपये.
1610 रुपयांना वस्तू ग्राहकाला विकून दुकानदाराने १५ टक्के नफा कमावला. म्हणजे वस्तूची मूळ किंमत जर 100 रुपये असेल तर विक्री किंमत 115 रुपये होते. मग जर वस्तूची विक्री किंमत 1610 रुपये असेल, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल?
वस्तूची मूळ किंमत x मानू.
\begin{aligned} \\ & \therefore \frac{x}{100}=\frac{1610}{115} \\ & \therefore x=\frac{1610 \times 100}{115} \\ & \therefore x=\frac{161000}{115} \\ & \therefore x=1400\end{aligned}
\therefore दुकानदाराने 1400 रुपयांना उत्पादकाकडून वस्तू खरेदी केली होती.
उदाहरण 6:
जर वस्तूची छापील किंमत 1700 रुपये आणि विक्री किंमत 1540 रुपये आहे, तर सूट काढा.
उत्तर:
सूट = (छापील किंमत) – (विक्री किंमत)
\thereforeसूट = (1700 – 1540) = 160 रुपये
उदाहरण 7:
990 रुपये छापील किंमत असलेल्या वस्तूवर दुकानदाराने 10 टक्के सूट दिली, तर त्या वस्तूची विक्री किंमत काय असेल?
उत्तर:
छापील किंमत = 990 रुपये आणि सूट = 10%
शेकडा सूट=छापील किंमत x \frac{10}{100}
\thereforeसूट=990 \times \frac{10}{100}=990 \times 0.1=99 रुपये
\thereforeविक्री किंमत = 990 – 99 = 891 रुपये
उदाहरण 8:
20% सूट दिल्यानंतर एका वस्तूची विक्री किंमत 900 रुपये आहे , तर तिची छापील किंमत काढा.
उत्तर:
विक्री किंमत = 900 रुपये
शेकडा सूट = 20%
म्हणजे वस्तूची छापील किंमत जर 100 रुपये असेल, तर त्या किमतीवर 20 रुपयांची सूट मिळते.
वस्तूची विक्री किंमत = (छापील किंमत – सूट)
विक्री किंमत = 100 -20 = 80 रुपये
जेंव्हा 80 रुपये विक्री किंमत असते, तेंव्हा 100 रुपये छापील किमत असते. मग जेंव्हा 900 रुपये विक्री किंमत असते, तेंव्हा छापील किंमत किती असेल?
छापील किंमत x मानू,
\begin{aligned} \\ & \therefore \frac{x}{100}=\frac{900}{80} \\ & \therefore x=\frac{900 \times 100}{80} \\ & \therefore x=\frac{90000}{80} \\ & \therefore x=1125\end{aligned}
\therefore त्या वस्तूची छापील किंमत 1125 रुपये असेल.
उदाहरण 9:
3000 रुपये छापील किंमत असलेल्या पंख्यावर दुकानदार 12% सूट देत असेल तर दिलेली सूट आणि पंख्याची विक्री किंमत काढा.
उत्तर:
पंख्याची छापील किंमत = 3000 रुपये
दिलेली शेकडा सूट = 12%
सूट = 3000 \times \frac{12}{100}=3000 \times 0.12=360 रुपये.
विक्री किंमत = छापील किंमत – सूट
विक्री किंमत = 3000 – 360 = 2640
दुकानदाराने एकूण 360 रुपयांची सूट दिलेली असून त्यामुळे पंखाची विक्री किंमत 2640 रुपये आहे.
उदाहरण 10:
2300 रुपये छापील किमतीचा मिक्सर दुकानदार गिऱ्हाईकाला 1155 रुपयांना विकतो, तर मिळालेली शेकडा सूट काढा.
उत्तर:
छापील किंमत = 2300 रुपये
विक्री किंमत = 1955 रुपये
मिळालेली सूट = छापील किंमत – विक्री किंमत
मिळालेली सूट = 2300 – 1955 = 345 रुपये
2300 रुपयांवर 345 रुपये सूट मिळते, तर 100 रुपयांवर किती सूट मिळेल?
\therefore \frac{100}{2300} \times 345=0.0434 \times 345=15%
दुकानदाराने मिक्सरवर 15% सूट दिलेली आहे.
उदाहरण 11:
एका टीव्हीवर दुकानदाराने 11% सूट दिल्याने गिऱ्हाइकाला 22,250 रुपयांना मिळतो, तर त्या टीव्हीची छापील किंमत काढा.
उत्तर:
टीव्हीची विक्री किंमत = 22,250 रुपये
दिलेली शेकडा सूट = 11%
जर टीव्हीची छापील किंमत 100 रुपये असेल आणि त्यावर 11% सूट दिली, तर टीव्हीची विक्रीची किंमत (100 – 11) = 89 रुपये होईल.
जर टीव्हीची विक्री किंमत 89 रुपये असताना छापील किंमत 100 रुपये असते, तर 22,250 रुपये विक्री किंमत असताना टीव्हीची छापील किंमत किती असेल?
टीव्हीची छापील किंमत क्स मानू,
\begin{aligned} \\ & \therefore \frac{x}{100}=\frac{22,250}{89} \\ & \therefore x=\frac{22,250 \time 100}{89} \\ & \therefore x=\frac{22,25000}{89} \\ & \therefore x=25,000\end{aligned}
टीव्हीची छापील किंमत 25,000 रुपये आहे.
उदाहरण 12:
एका वस्तूवर 10% सूट दिल्यावर ग्राहकाला त्या वस्तूवर एकूण 17 रुपयांची सूट मिळते, तर त्या वस्तूची विक्री किंमत काय असेल?
उत्तर:
विक्री किंमत = (छापील किंमत – सूट)
दुकानदाराने 10% सूट दिलेली आहे. जर वस्तूची छापील किंमत 100 रुपये असेल तर ग्राहकाला एकूण 10 रुपये सूट मिळेल. म्हणजे वस्तूची विक्री किंमत = (100 – 10) = 90 रुपये असेल.
जर 10 रुपये सूट मिळाल्यावर वस्तूची विक्री किंमत 90 रुपये होत असेल, तर 17 रुपये सूट मिळाल्यावर वस्तूची विक्री किंमत काय असेल?
वस्तूची विक्री किंमत x मानूया,
\begin{aligned} \\ &\therefore \frac{x}{90}=\frac{17}{10} \\ &\therefore x=\frac{17 \times 90}{10} \\ &\therefore x=\frac{1530}{10} \\ &\therefore x=135 \\ \end{aligned}
वस्तूची विक्री किंमत 135 रुपये असेल.
उदाहरण 13:
दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकायची ठरवतो आणि त्याची छापील किंमत २५ टक्क्यांनी वाढवून ग्राहकाला सांगतो. पण ती वस्तू ग्राहकाला देताना २० टक्के सूट देतो. या व्यवहारात दुकानदाराने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक पडतो?
उत्तर:
समजा दुकानदाराने ठरवलेली किंमत 100 रुपये आहे. दुकानदार ठरवलेल्या किमतीपेक्षा छापील किंमत 25 टक्क्यांनी वाढवतो. म्हणजे वस्तूची छापील किंमत (100 + 25) = 125 रुपये होते.
ह्या 125 रुपये छापील किमतीवर दुकानदार ग्राहकाला 20 टक्के सूट देतो.
\therefore \left(125 \times \frac{20}{100}\right) = 25 रुपये . म्हणजे दुकानदार ग्राहकाला एकूण 25 रुपये सूट देतो; याचा अर्थ ग्राहकाला ती वस्तू (125 – 25) = 100 रुपयांना पडते.
म्हणजेच दुकानदाराने ठरवलेली 100 रुपये किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची 100 रुपये किंमत सारखी असल्याने, या दोन किमतीतील फरक 0% आहे.
कमिशन म्हणजे काय?
उत्पादकांकडे आपल्या कारखान्यात तयार केलेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःची यंत्रणा नसते. अशा वेळी उत्पादक आपला माल मध्यस्थांमार्फत ग्राहकांना विकतात आणि त्या बदल्यात मध्यस्थांना मालाची विक्री करून दिल्याबद्दल मोबदला देतात. ह्या मोबदल्याला “कमिशन” म्हणतात आणि मध्यस्थाला “दलाल” किंवा “कमिशन एजंट” म्हणतात.
जमीन, घरं यांच्या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्यांसाठी “दलाल” किंवा “कमिशन एजंट” ह्या व्यतिरिक्त “इस्टेट एजंट” ही अजून एक संज्ञा प्रचलित आहे. तसेच शेतमालाचे व्यवहार करणाऱ्या मध्यस्थांना “दलाल” किंवा “अडत्या” म्हणतात आणि कमिशनला “दलाली” किंवा “अडत” म्हणतात.
व्यवहाराच्या अटी/नियमांप्रमाणे कमिशन (किंवा दलाली/अडत) हे माल उत्पादकाकडून किंवा ग्राहकाकडून किंवा दोघांकडूनही घेतलं जाऊ शकतं.
कमिशनची उदाहरणं
उदाहरण 1:
अमितने एका दलालामार्फत महेशकडून एक भूखंड 2,50,000 रुपयांना विकत घेतला. हा भूखंडाचा व्यवहार पूर्णत्वास नेण्यासाठी दलालाने (किंवा कमिशन एजंटने) अमित आणि महेश, दोघांकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली; तर दलालाला एकूण किती रुपये दलाली मिळाली?
उत्तर:
भूखंडाची किंमत = 2,50,000 रुपये
दलाली =250000 \times \frac{2}{100}=5000 रुपये.
दलालाने अमित आणि महेश दोघांकडूनही दलाली घेतली असल्याने एकूण दलाली = 5000 + 5000 = 10,000 रुपये.
उदाहरण 2:
प्रतिक्विंटल 4050 रुपये दराने राजेशने अडत्यामार्फत 10 किलो तांदूळ विकला. ह्या व्यवहारासाठी राजेशने अडत्याला 1% अडत दिली; तर तांदूळ विकून राजेशला किती रक्कम मिळाली?
उत्तर:
तांदळाची विक्री किंमत =10 \times 4050=40,500 रुपये.
तांदळाच्या विक्री किमतीवर राजेशने अडत्याला 1% अडत दिली.
अडत =40,500 \times \frac{1}{100}=405 रुपये.
तांदळाच्या विक्रीतून राजेशला मिळालेली एकूण रक्कम =\left(40,500-405\right)= 40,095 रुपये.
रिबेट म्हणजे काय?
सणासुदीच्या दिवसात किंवा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, गांधीजयंती सारख्या काही विशेष दिवशी खादी ग्रामोद्योग किंवा हस्तकला भांडार सारख्या काही संस्था ग्राहकांसाठी वस्तूंवर सूट जाहीर करतात. ह्या सुटीमुळे किंवा सवलतीमुळे विक्रीतून जेवढी कमी रक्कम ह्या संस्थांना मिळते, तेवढ्या रकमेची भरपाई सरकारकडून केली जाते. ह्या सुटीला किंवा सवलतीला “रिबेट” म्हणतात.
वार्षिक उत्पन्नाच्या ठराविक मर्यादेपर्यंत सरकार आयकरावर सूट देते, त्या सुटीलाही “रिबेट” म्हणतात.
\blacktrianglerightरिबेट म्हणजे एक प्रकारची सूटच असते. ही सूट काही विशिष्ट अटीनुसार सरकार किंवा मान्यताप्राप्त संस्थांकडून दिली जाते.
रिबेटची उदाहरणं
उदाहरण 1:
शिल्पाने सरकारी भांडारातून प्रत्येकी 525 रुपये किमतीच्या 2 सतरंज्या आणि प्रत्येकी 375 रुपये किमतीच्या 2 चादरी विकत घेतल्या. ह्या खरेदीवर शिल्पाला 15% रिबेट मिळाले; तर रिबेटची रक्कम किती आणि शिल्पाला एकूण किती पैसे द्यावे लागतील?
उत्तर:
सतरंज्यांची एकूण किंमत =2 \times 525=1050 रुपये
चादरींची एकूण किंमत =2 \times 375=750 रुपये
खरेदीची एकूण किंमत =1050+750=1800 रुपये.
खरेदीच्या एकूण किमतीवर 15\% रिबेट मिळाला आहे;
\therefore रिबेटची रक्कम =1800 \times \frac{15}{100}=270 रुपये.
\therefore शिल्पाला एकूण द्यावी लागणारी किंमत =1800-270=1530 रुपये.
उदाहरण 2:
एका शेतकऱ्याची 4500 रुपये किमतीची डाळिंबं अमेयने विकून दिली. त्या व्यवहारासाठी शेतकऱ्याने अमेयला 15% अडत दिली; तर अमेयला एकूण किती रुपये अडत मिळाली?
उत्तर:
डाळिंबांची एकूण किंमत = 4500 रुपये.
अमेयला मिळालेली अडत = डाळिंबांच्या किमतीच्या 15%
\therefore अडत =\left(4500 \times \frac{15}{100}\right)=\left(4500 \times 0.15\right) =675
\therefore अमेयला एकूण 675 रुपये अडत मिळाली.
उदाहरण 3:
सुभानरावांनी 15,000 रुपयांची फुलं विकण्यासाठी दलालाला शेकडा 4 दलाली दिली; तर दलालाला एकूण किती रक्कम दिली? सुभानरावांना विक्रीची एकूण किती रक्कम मिळाली?
उत्तर:
फुलांच्या विक्रीची एकूण किंमत = 15,000 रुपये
दलाली = फुलांच्या किमतीच्या 4%
\therefore दलालाची एकूण रक्कम =\left(15000 \times \frac{4}{100}\right)=600 रुपये.
\therefore फुलं विकून मिळालेली एकूण रक्कम = (फुलांची किंमत – दलाली)
\therefore फुलं विकून मिळालेली एकूण रक्कम =15000-600=14,400
\therefore सुभानरावांना एकूण 14,400 रुपये मिळाले.
उदाहरण 4:
अब्दुलभाईंनी आपल्याकडचा 9200 रुपये किमतीचा शेतमाल 2% अडत देऊन अडत्यामार्फत विकला; तर त्यांना अडत्याला एकूण किती रक्कम द्यावी लागली?
उत्तर:
शेतमालाची किंमत = 9200 रुपये
अडत = शेतीमालाच्या किमतीच्या 2%
\therefore अडतेची एकूण रक्कम =9200 \times \frac{2}{100}=184
\therefore अब्दुलभाईंना अडत्याला एकूण 184 रुपये अडत द्यावी लागली.
उदाहरण 5:
मंजिरीताईंनी खादीच्या दुकानातून प्रत्येकी 560 रुपये किमतीच्या 3 साड्या आणि प्रत्येकी 90 रुपये किमतीच्या 6 मधाच्या बाटल्या खरेदी केल्या. ह्या खरेदीवर त्यांना 12% रिबेट मिळाले; तर त्यांना दुकानदाराला एकूण किती पैसे द्यावे लागले?
उत्तर:
3 साड्यांची एकूण किंमत = 560 x 3 = 1680 रुपये.
6 मधाच्या बाटल्यांची एकूण किंमत = 6 x 90 = 540 रुपये.
खरेदीची एकूण किंमत = (3 साड्यांची एकूण किंमत + 6 मधाच्या बाटल्यांची एकूण किंमत).
खरेदीची एकूण किंमत = 1680 + 640 = 2220 रुपये.
ह्या खरेदीवर मंजिरीताईंना 12% रिबेट मिळाले.
\therefore रिबेटची एकूण रक्कम =2220 \times \frac{12}{100}=266.40 रुपये.
\therefore दुकानदाराला द्यावी लागलेली एकूण रक्कम = (खरेदीची एकूण किंमत – रिबेटची एकूण रक्कम) =\left(2220-266.40\right)=1953.60 रुपये.<br>[latex]\therefore मंजिरीताईंना दुकानदाराला एकूण 1953 रुपये 60 पैसे द्यावे लागले.
उदाहरण 6:
समीरने दलालामार्फत जोसेफकडून 7,50,000 रुपये किमतीचं घर विकत घेतलं. ह्या व्यवहारासाठी दलालाने दोघांकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली; तर दलालीची रक्कम, समीरला घर खरेदीसाठी द्यावी लागलेली रक्कम आणि जोसेफला घर विकून मिळालेली रक्कम काढा.
उत्तर:
घराची किंमत = 7,50,000 रुपये.
दलाली = 2%.
घर खरेदी करायला समीरला द्यावी लागलेली दलाली =\left(7,50,000 \times \frac{2}{100}\right)=15,000 रुपये.
घर खरेदी करायला समीरला द्यावी लागलेली एकूण रक्कम = (घराची किंमत - दलाली) =\left(7,50,000-15,000\right)=7,35,000 रुपये.
घर विकण्यासाठी जोसेफला द्यावी लागलेली दलाली =\left(7,50,000 \times \frac{2}{100}\right)=15,000 रुपये.
घर विक्री करून जोसेफला मिळालेली एकूण रक्कम = (घराची किंमत - दलाली) =\left(7,50,000-15,000\right)=7,35,000 रुपये.
सूट व कमिशन म्हणजे व्यवसायात विक्री वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सवलती व प्रोत्साहने. व्यापारी आणि कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतात, त्यामध्ये सूट व कमिशन हा महत्त्वाचा भाग असतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि वितरक व एजंट यांना प्रोत्साहित करण्यासाठी सूट व कमिशन दिले जाते. प्रत्येक व्यवसायात सूट व कमिशन विविध प्रकारे दिले जाते. किरकोळ व्यापारामध्ये ग्राहकांना उत्पादने स्वस्तात मिळावीत म्हणून, तर घाऊक व्यापारामध्ये वितरक व एजंट यांना अधिकाधिक विक्रीसाठी प्रेरित करण्यासाठी सूट व कमिशन वापरले जाते. सूट व कमिशन धोरणांमुळे ग्राहक आणि व्यवसाय दोघांनाही फायदा होतो. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक्स किंवा वाहन विक्रीच्या व्यवसायात विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना ठराविक सूट दिली जाते आणि तो व्यवहार घडवून आणल्याबद्दल दुकानातील विक्री प्रतिनिधीला कमिशन दिले जाते. अशा प्रकारे सूट व कमिशनमुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांचा फायदा होतो. सूट व कमिशनमुळे औषध विक्री व्यवसायातही खूप फायदा होतो. ठरावीक औषधे डॉक्टरांनी रुग्णाला लिहून दिल्याबद्दल औषध निर्मिती कंपन्या डॉक्टरांना कमिशन देतात, तसेच ती औषधे ग्राहकांनाविकताना विक्रेता त्यावर सूटही देतो. अशा प्रकारे सूट व कमिशन दिल्याने औषधांची विक्री वाढते. या सर्व उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की, इयत्ता 8 वी सूट व कमिशन म्हणजे काय? हे व्यवसायाच्या यशासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. योग्य पद्धतीने वापरल्यास सूट व कमिशन व्यवसायाच्या वाढीला गती देऊ शकते. म्हणून सूट व कमिशन ह्या संकल्पना शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. |
इयत्ता 8 वीचे पाठयपुस्तक: इथे क्लिक करा
