इयत्ता 8 वी एकचल समीकरणे म्हणजे काय?

इयत्ता 8 वी एकचल समीकरणे म्हणजे काय?

Go to top




Go to top


Go to top


Go to top


उदा 2:
2a+4=0
चलाच्या संभाव्य किमती: a=2, -2 आणि 1
उत्तर:
आता आपण a च्या दिलेल्या संभाव्य किमती समीकरणामध्ये वापरून बघू. ज्या a च्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू सामान होतील, ती a ची योग्य किंमत असेल.

a) जर a=2,
\begin{aligned} \\ & \therefore \left(2\times 2\right)+4=0 \\ & \therefore 4+4=0 \\ & \therefore 8=0 \quad {\color{red} \text{✘}}\end{aligned}

म्हणून -2 ही a ची योग्य किंमत आहे कारण त्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात.


उदा 3:
9m=81
चलाच्या संभाव्य किमती: m=3, 9 आणि -3
उत्तर:
आता आपण m च्या दिलेल्या संभाव्य किमती समीकरणामध्ये वापरून बघू. ज्या m च्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू सामान होतील, ती m ची योग्य किंमत असेल.
a) जर m=3,
\begin{aligned} \\ & \therefore 9\times 3=81 \\ & \therefore 27=81 \quad \mathbf{\color{red} \text{✘}}\end{aligned}

b) जर m=9,
\begin{aligned} \\ & \therefore 9\times 9=81 \\ & \therefore 81=81 \quad \mathbf{\color{green}{\checkmark}}\end{aligned}

c) जर m=-3,
\begin{aligned} \\ & \therefore 9\times -3=81 \\ & \therefore -27=81 \quad \mathbf{\color{red} \text{✘}}\end{aligned}

म्हणून 9 ही m ची योग्य किंमत आहे कारण त्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात.














Go to top

शाब्दिक उदाहरणं म्हणजे काय ते आपण काही उदाहरणांवरून समजावून घेऊ,
1) अनिलला वार्षिक परीक्षेत प्रथमेशच्या गुणांपेक्षा 20 गुण जास्त मिळाले. जर प्रथमेशचे गुण 55 असतील, तर अनिलला मिळालेले गुण किती?
2) क्रिकेटच्या सामन्यात स्मिता आणि स्नेहा ह्यांच्या धावांची बेरीज 210 आहे; जर स्मिताने 92 धावा केल्या आहेत, तर स्नेहाच्या धावा किती?
3) अमोलच्या वडिलांचं वय त्याच्या वयाच्या तिप्पटीहुन 4 वर्षे जास्त आहे. जर वडिलांचं वय 49 वर्षे असेल तर अमोलचं वय किती?
ह्या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की शाब्दिक उदाहरणं कशा स्वरूपाची असतात. ही उदाहरणं सोडवताना अतिशय काळजीपूर्वक वाचावी लागतात. दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला समीकरण तयार करून घ्यावे लागते आणि त्या समीकरणाची उकल हे त्या उदाहरणाचे उत्तर असते.


Go to top

उदा 1:
माझ्या मित्राचं वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षे जास्त आहे. जर मित्राचं वय 12 असेल तर माझं वय किती?
उत्तर:
आधी उदाहरण नीट वाचा: “. . . तर माझं वय किती?” -> इथे आपल्याला “माझं” वय काढायचं आहे. त्यामुळे आपण “माझं वय” x वर्षे मानू.

आता उदाहरणाचा पहिला भाग वाचा: “माझ्या मित्राचं वय माह्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षे जास्त आहे.” -> माझं वय x वर्षे मानलं आहे, म्हणून माझं निम्म वय होईल \left(\frac{1}{2}\times x\right) वर्षे आणि मित्राचं वय \left(\frac{1}{2}\times x\right)+5 वर्षे होईल.

आता उदाहरणाचा दुसरा भाग वाचा: “जर मित्राचं वय 12 वर्षे असेल . . .” -> म्हणजे \left(\frac{1}{2}\times x\right)+5=12, आता हे समीकरण आपण सोडवूया,

\begin{aligned} \\ & \left(\frac{1}{2}\times x\right)+5=12\end{aligned}

समीकरणाच्या दोन्ही बाजूंतून 5 वजा करूया,
\begin{aligned} \\ & \therefore \left(\frac{1}{2}\times x\right)+5-5=12-5 \\ & \therefore \frac{x}{2}=7\end{aligned}

समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 2 ने गुणूया,
\begin{aligned} \\ & \therefore \frac{x}{2}\times 2=7\times 2 \\ & \mathbf{\therefore x=14}\end{aligned}
म्हणून “माझं वय” 14 वर्षे आहे.


उदा 2:
समीरचं वजन त्याच्या धाकट्या भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किग्रॅ आहे, तर समीरचं वजन काढा.
उत्तर:
उदाहरण नीट वाचा: “समीरचं वजन त्याच्या धाकट्या भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे.” -> म्हणजे भावाचं वजन x मानलं, तर समीरचं वजन 2x होईल.

आता उदाहरणाचा दुसरा भाग वाचा: “दोघांचे मिळून वजन 63 किग्रॅ आहे.” -> म्हणजे x+2x=63. आता हे समीकरण आपण सोडवूया,

\begin{aligned} \\ & x+2x=63 \\ & \therefore 3x=63\end{aligned}

आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 3 ने भागूया,
\begin{aligned} \\ & \therefore \frac{3x}{3}=\frac{63}{3} \\ & \therefore x=21\end{aligned}
समीरच्या भावाचं वजन 21 किग्रॅ आहे.

म्हणून समीरचं वजन \mathbf{2x=2\times21=42} किग्रॅ आहे.


उदा 3:
एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यांमध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास \frac{6}{5} हा अपूर्णांक मिळतो, तर तो अपूर्णांक काढा.
उत्तर:
उदाहरण नीट वाचा: “एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे.” -> म्हणजे छेद x असेल, तर अंश x+5 होईल.

आता उदाहरणाचा दुसरा भाग वाचा: “अंश व छेद यांमध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास \frac{6}{5} हा अपूर्णांक मिळतो.” -> \frac{\left(x+5\right)+4}{x+4}=\frac{6}{5}. आता हे समीकरण आपण सोडवूया,

\begin{aligned} \\ & \frac{\left(x+5\right)+4}{x+4}=\frac{6}{5} \\ & \therefore \frac{x+5+4}{x+4}=\frac{6}{5} \\ & \therefore \frac{x+9}{x+4}=\frac{6}{5} \\ & \therefore 5\times \left(x+9\right)=6\times \left(x+4\right) \\ & \therefore 5x+45=6x+24\end{aligned}

समीकरणाच्या दोन्ही बाजूंतून 24 वजा करूया,
\begin{aligned} \\ & \therefore 5x+45-24=6x+24-24 \\ & \therefore 5x+21=6x\end{aligned}

समीकरणाच्या दोन्ही बाजूंतून 5x वजा करूया,
\begin{aligned} \\ & \therefore 5x+21-5x=6x-5x \\ & \therefore 21=x \\ & \therefore x=21\end{aligned}
छेद 21 आहे.

अंश छेदापेक्षा 5 ने मोठा आहे.
म्हणून अंश x+5=21+5=26

म्हणून अपूर्णांक \mathbf{\frac{26}{21}} आहे.


उदा 4:
रियान जवळ असलेली रक्कम प्रियांका जवळ असलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा 200 रुपयांनी जास्त आहे. रियान जवळचे 300 रुपये प्रियांकाला दिले, तर रियान जवळची रक्कम प्रियांका जवळच्या रकमेच्या \frac{7}{4} पट होते; तर प्रियांका जवळ मूळ रक्कम किती होती?
उत्तर:
उदाहरणाचा पहिला भाग लक्षपूर्वक वाचा: “रियान जवळ असलेली रक्कम प्रियांका जवळ असलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा 200 रुपयांनी जास्त आहे.” -> म्हणजे आपण जर प्रियांका जवळची रक्कम x मानली, तर रियान जवळची रक्कम \left(3x+200\right) होईल.

आता उदाहरणाचा दुसरा भाग वाचा: “रियान जवळचे 300 रुपये प्रियांकाला दिले . . .” -> ह्याचा अर्थ प्रियांका जवळची रक्कम आता 300 रुपयांनी वाढली आहे, म्हणजे \left(x+300\right) रुपये झाली आहे. आणि त्याच प्रमाणे रियान जवळची रक्कम आता 300 रुपयांनी कमी झाली आहे, म्हणजे \left(3x+200\right)-300 रुपये झाली आहे.

परत एकदा उदाहरणाचा दुसरा भाग वाचा: “रियान जवळचे 300 रुपये प्रियांकाला दिले, तर रियान जवळची रक्कम प्रियांका जवळच्या रकमेच्या \frac{7}{4} पट होते” -> ह्याचा अर्थ (रियान जवळची रक्कम)=\frac{7}{4}\times (प्रियांका जवळची रक्कम), म्हणजेच \left(3x+200\right)-300=\frac{7}{4}\times \left(x+300\right). आता आपण हे समीकरण सोडवूया,

\begin{aligned} \\ & \therefore \left(3x+200\right)-300=\frac{7}{4}\times \left(x+300\right) \\ & \therefore 3x+200-300=\frac{7}{4}\times \left(x+300\right) \\ & \therefore 3x-100=\frac{7}{4}\times \left(x+300\right) \\ & \therefore 4\times \left(3x-100\right)=7\times \left(x+300\right) \\ & \therefore 12x-400=7x+2100\end{aligned}

समीकरणाच्या दोन्ही बाजूंत 400 मिळवूया,
\begin{aligned} \\ & \therefore 12x-400+400=7x+2100+400 \\ &\therefore 12x=7x+2500\end{aligned}

समीकरणाच्या दोन्ही बाजूंतून 7x वजा करूया,
\begin{aligned} \\ & \therefore 12x-7x=7x+2500-7x \\ & \therefore 5x=2500\end{aligned}

समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 5 ने भागूया,
\begin{aligned} \\ & \therefore \frac{5x}{5}=\frac{2500}{5} \\ & \mathbf{\therefore x=500}\end{aligned}
प्रियांका जवळ 500 रुपये होते.










आधी सरासरी कशी काढतात ते बघू,
सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / दिलेल्या संख्यांची संख्या.
उदाहरणार्थ 10, 15 आणि 20 ह्या 3 संख्यांची सरासरी पुढील प्रमाणे काढतात,
\therefore सरासरी =\frac{10+15+20}{3}=\frac{45}{3}=15

ह्या उदाहरणांवरून एकचल समीकरणे शाब्दिक उदाहरणे कशा प्रकारे सोडवली जातात, हे तुमच्या लक्षात आलं असेल.


Go to top


Go to top

ओळख

You cannot copy content of this page

error: Content is protected !!
Scroll to Top