इयत्ता 8 वी बहुपदींचा भागाकार कसा करतात?

इयत्ता 8 वी बहुपदींचा भागाकार कसा करतात?

इयत्ता 8 वी बहुपदींचा भागाकार कसा करतात? हे शिकण्याआधी बैजिक राशींवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या मूलभूत गणितीय क्रिया कशा करायच्या ते आपण पाहू,

बेरीज:
5a+2a=7a




Go to top

बहुपदी ह्या बैजिक राशी असल्याने त्यांच्यावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणितीय क्रिया करता येतात. आपण ह्याची काही उदाहरणं बघुयात,

\begin{aligned} \\ 1)\;&\left(2m^2+4m\right)\times\left(5m^2-3m\right) \\ &=2m^2\left(5m^2-3m\right)+4m\left(5m^2-3m\right) \\ &=10m^4-6m^3+20m^3-12m^2 \\ &=10m^4+14m^3-12m^2\end{aligned}

\begin{aligned} \\ 2)\;&\left(4x^3+8x2+3x+20\right)-\left(7x^2-15x+35\right) \\ &= 4x^3+8x^2+3x+20-7x^2+15x-35 \\ &=4x^3+x^2+18x-15\end{aligned}

बहुपदीची कोटी: बहुपदीतील चलांच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात.
उदा: 4x^3-5x+20 ह्या बहुपदीची कोटी 3 आहे कारण ह्या बहुपदीतील चलाचा (म्हणजे x चा) सर्वात मोठा घातांक 3 आहे.
उदा: 20p^5+23p^6+15p^2+19 ह्या बहुपदीची कोटी 6 आहे कारण ह्या बहुपदीतील चलाचा (म्हणजे p चा) सर्वात मोठा घातांक 6 आहे.

Go to top

इयत्ता 8 वी बहुपदींचा भागाकार कसा करतात? हे शिकताना आत्तापर्यंत आपण बहुपदी म्हणजे काय, बहुपदीची कोटी म्हणजे काय आणि बहुपदींवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या मूलभूत गणितीय क्रिया कशा करता येतात, ते शिकलो. आता आपण आधी एकपदीचा भागाकार कसा करायचा ते पाहू,

एकपदीचा भागाकार

\mathbf{1)}\;20a^3\div 4a
ह्या उदाहरणात 20a^3 ही एक एकपदी आहे आणि 4a ही दुसरी एकपदी आहे. इथे एक लक्षात घ्या की भागाकार ही गुणाकाराच्या उलट क्रिया असते. त्यामुळे 20a^3 ला 4a ने भागताना आपल्याला हे पहायचे आहे की 4a ला कुठल्या एकपदीने गुणलं की गुणाकार 20a^3 येईल.
इथे तुमच्या लक्षात येईल की 4a ला 5a^2 ने गुणल्यावर गुणाकार 20a^3 येतो.
याचाच अर्थ असा की 4a ने 20a^3 ला भागल्यावर उत्तर 5a^2 येतं. हेच आपण भागाकाराच्या स्वरूपात पुढील प्रमाणे लिहू शकतो,
\begin{aligned} \\ \mathbf{5a^2}\phantom{)}\\ 4a{\overline{\smash{\big)}\;20a^3\phantom{)}}} \\ \underline{-20a^3\phantom{)}} \\ 0\phantom{xx}\end{aligned}


Go to top

बहुपदीला एकपदीने भागणे

\mathbf{1)}\left(6x^3+8x^2\right)\div 2x
उत्तर:
ह्या उदाहरणात दिलेल्या बहुपदीत 6x^3 आणि 8x^2 ह्या दोन एकपदी आहेत. भागाकार करताना ह्या एकपदींना दिलेल्या 2x ह्या एकपदीने भागालं, की हा भागाकार पूर्ण होतो.
\begin{aligned} \\ 3x^2+4x\phantom{x} \\ 2x{\overline{\smash{\big)}\,6x^3+8x^2}} \\ \underline{-\;6x^3\phantom{+8x^2x}} \\ 0\phantom{-\,}+8x^2 \\ \underline{-\,8x^2} \\ 0\phantom{00}\end{aligned}


\mathbf{2)}\;\left(12p^3-6p^2+4p\right)\div 3p^2
उत्तर:
ह्या उदाहरणात दिलेल्या बहुपदीत 12p^3, -6p^2 आणि 4p ह्या तीन एकपदी आहेत. भागाकार करताना ह्या एकपदींना दिलेल्या 3p^2 ह्या एकपदीने भागालं, की हा भागाकार पूर्ण होतो.
\begin{aligned} \\ 4p-2\phantom{xxxxxx} \\ 3p^2{\overline{\smash{\big)}\,12p^3-6p^2+4p}} \\ \underline{-\,12p^3\phantom{-6p^2+4pp}} \\ 0\phantom{p^3}-6p^2+4p \\ \underline{-(-\,6p^2)\phantom{+4p\,}} \\ 0\phantom{p^2}+4p\end{aligned}
इथे भागाकार 4p-2 आहे आणि 4p बाकी आहे.

\mathbf{3)}\;\left(15y^4+10y^3-3y^2\right)\div 5y^2
उत्तर:
ह्या उदाहरणात दिलेल्या बहुपदीत 15y^4, 10y^3 आणि -3y^2 ह्या तीन एकपदी आहेत. भागाकार करताना ह्या एकपदींना दिलेल्या 5y^2 ह्या एकपदीने भागालं, की हा भागाकार पूर्ण होतो.
\begin{aligned} \\ 3y^2+2y-\frac{3}{5}\phantom{xxx} \\ 5y^2{\overline{\smash{\big)}\,15y^4+10y^3-3y^2}} \\ \underline{-\,15y^4\phantom{+10y^3-3y^2y}} \\ 0\phantom{-\,15}+10y^3-3y^2 \\ \underline{-\,10y^3\phantom{-3y^2y}} \\ 0\phantom{-\10}-3y^2 \\ \underline{-(-3y^2)} \\ 0\phantom{xx}\end{aligned}


\mathbf{4)}\;\left((5x^4-3x^3+4x^2+2x-6)\right)\div x^2
उत्तर:
ह्या उदाहरणात दिलेल्या बहुपदीत 5x^4, -3x^3, 4x^2, 2x आणि -6 ह्या पाच एकपदी आहेत. भागाकार करताना ह्या एकपदींना दिलेल्या x^2 ह्या एकपदीने भागालं, की हा भागाकार पूर्ण होतो.
\begin{aligned} \\ 5x^2-3x+4\phantom{xxxxxx} \\ x^2{\overline{\smash{\big)}\,5x^4-3x^3+4x^2+2x-6}} \\ \underline{-\,5x^4\phantom{-3x^3+4x^2+2x-6x}} \\ 0\phantom{x^4}-3x^3+4x^2+2x-6 \\ \underline{-(-\;3x^3)\phantom{+4x^2+2x-6}} \\ 0\phantom{x^3}+4x^2+2x-6 \\ \underline{-\,4x^2\phantom{+2x-6x}} \\ 0\phantom{x^2}+2x-6 \end{aligned}
इथे भागाकार 5x^2-3x+4 आहे आणि 2x-6 बाकी आहे.

महत्वाचं: बहुपदीचा भागाकार करताना जेव्हा बाकी शून्य उरते किंवा बाकीची कोटी ही भाजक बहुपदीच्या कोटीपेक्षा लहान असते तेव्हा भागाकाराची क्रिया पूर्ण होते.
वरील उदाहरण 1 आणि 2 मध्ये बाकी शून्य उरत असल्याने भागाकार पूर्ण झाला आहे.
उदाहरण 3 आणि 4 मध्ये बाकीची कोटी ही भाजकाच्या कोटीपेक्षा लहान असल्याने भागाकार पूर्ण झाला आहे.
उदाहरण 3 मध्ये भाजक 3p^2 ची कोटी 2 आणि बाकी 4p ची कोटी 1 आहे.
उदाहरण 4 मध्ये भाजक x^2 ची कोटी 2 आणि बाकी 2x-6 ची कोटी 1 आहे.

बहुपदींचा भागाकार शिकण्यासाठी बहुपदीला एकपदीने भागायची अजून काही उदाहरणे आपण सोडवूयात,

\mathbf{1)}\;21m^2\div 7m
उत्तर:
\begin{aligned} \\ \mathbf{3m}\phantom{*}\\ 7m{\overline{\smash{\big)}\;21m^2}} \\ \underline{-21m^2} \\ \mathbf{0}\phantom{**}\end{aligned}
म्हणून भागाकार 3m आहे आणि बाकी 0 आहे.


\mathbf{2)}\;-48p^4\div -9p^2
उत्तर:
ह्या उदाहरणात -48p^4 ला -9p^2 ने पूर्ण भाग जात नाही आणि त्यामुळे आपल्याला आधी हे पहायचे आहे की -9p^2 ने -48p^4 ला भागायला -9p^2 ला कोणत्या संख्येने गुणावं लागेल.
इथे आपण गुणक x मानू,
\begin{aligned} \\ & -9p^2\times x=-48p^4 \\ & \therefore x=\frac{-48p^4}{-9p^2}\end{aligned}
आता आपण अंश आणि छेदाचे अवयव पाडून घेऊ,
\begin{aligned} \\ & \therefore x=\frac{-(2\times 2\times\ 2\times 2\times\ \cancel{3})p^{\cancel{4}2}}{(-3\times \cancel{3})\cancel{p^2}} \\ &\therefore x=\frac{16}{3}p^2\end{aligned}
म्हणून . . .
\begin{aligned} \\ \mathbf{\frac{16}{3}p^2}\phantom{*} \\ -9p^2{\overline{\smash{\big)}\;-48p^4\;}} \\ \underline{-(-48p^4)} \\ \mathbf{0}\phantom{***}\end{aligned}
म्हणून भागाकार \frac{16}{3}p^2 आहे आणि बाकी 0 आहे.


\mathbf{3)}\;(5x^3-3x^2)\div x^2
उत्तर:
\begin{aligned} \\ \mathbf{5x-3}\phantom{*}\\ x^2{\overline{\smash{\big)}\;5x^3-3x^2}} \\ \underline{-5x^3\phantom{-3x^2*}} \\ 0\phantom{*}-3x^2\; \\ \underline{-(-\,3x^2)} \\ \mathbf{0}\phantom{**}\end{aligned}
म्हणून भागाकार 5x-3 आहे आणि बाकी 0 आहे.


\mathbf{4)}\;(2y^3+4y^2+3)\div 2y^2
उत्तर:
\begin{aligned} \\ \mathbf{y+2}\phantom{***} \\ 2y^2{\overline{\smash{\big)}\;2y^3+4y^2+3}} \\ \underline{-2y^3\phantom{+4y^2+3*}} \\ 0\phantom{**}+4y^2+3 \\ \underline{-\,4y^2\phantom{+3*}} \\ 0\phantom{**}+\mathbf{3}\end{aligned}
म्हणून भागाकार y+2 आहे आणि बाकी 3 आहे.


\mathbf{5)}\;(6x^5-4x^4+8x^3+2x^2)\div 2x^2
उत्तर:
\begin{aligned} \\ \mathbf{3x^3-2x^2+4x+1}\phantom{*}\\ 2x^2{\overline{\smash{\big)}\;6x^5-4x^4+8x^3+2x^2}} \\ \underline{-6x^5\phantom{-4x^4+8x^3+2x^2*}} \\ 0\phantom{**}-4x^4+8x^3+2x^2 \\ \underline{-(-\,4x^4\,)\phantom{+8x^3+2x^2}} \\ 0\phantom{**}+8x^3+2x^2 \\ \underline{-\,8x^3\phantom{+2x^2*}} \\ 0\phantom{**}+2x^2 \\ \underline{-\,2x^2} \\ \mathbf{0}\phantom{**}\end{aligned}
म्हणून भागाकार 3x^3-2x^2+4x+1 आहे आणि बाकी 0 आहे.

\mathbf{6)}\;40a^3\div -10a
उत्तर:
\begin{aligned} \\ \mathbf{-4a^2} \\ -10a{\overline{\smash{\big)}\;40a^3\;}} \\ \underline{-(-40a^3)} \\ \mathbf{0}\phantom{**}\end{aligned}
म्हणून भागाकार -4a^2 आहे आणि बाकी 0 आहे.


\mathbf{7)}\;40m^5\div 30m^3
ह्या उदाहरणात 40m^5 ला 30m^3 ने पूर्ण भाग जात नाही आणि त्यामुळे आपल्याला आधी हे पहायचे आहे की 30m^3 ने 40m^5 ला भागायला 30m^3 ला कोणत्या संख्येने गुणावं लागेल.
इथे आपण गुणक x मानू,
\begin{aligned} \\ & 30m^2\times x=40m^5 \\ & \therefore x=\frac{40m^5}{30m^3}\end{aligned}
आता आपण अंश आणि छेदाचे अवयव पाडून घेऊ,
\begin{aligned} \\ & \therefore x=\frac{(2\times 2\times\ \cancel{2}\times \cancel{5})\times m^{\cancel{5}2}}{(\cancel{2}\times 3\times \cancel{5})\times \cancel{m^3}} \\ &\therefore x=\frac{4}{3}m^2\end{aligned}
म्हणून . . .
\begin{aligned} \\ \mathbf{\frac{4}{3}m^2}\phantom{*} \\ 30m^3{\overline{\smash{\big)}\;40m^5}} \\ \underline{-40m^5} \\ \mathbf{0}\phantom{**}\end{aligned}
म्हणून भागाकार \frac{4}{3}m^2 आहे आणि बाकी 0 आहे.


\mathbf{8)}\;(8p^3-4p^2)\div 2p^2
उत्तर:
\begin{aligned} \\ \mathbf{4p-2}\phantom{*}\\ 2p^2{\overline{\smash{\big)}\;8p^3-4p^2}} \\ \underline{-8p^3\phantom{-4p^2*}} \\ 0\phantom{*}-4p^2\; \\ \underline{-(-\,4p^2)} \\ \mathbf{0}\phantom{**}\end{aligned}
म्हणून भागाकार 4p-2 आहे आणि बाकी 0 आहे.


\mathbf{9)}\;(21x^4-14x^2+7x)\div 7x^3
उत्तर:
\begin{aligned} \\ \mathbf{3x}\phantom{****} \\ 7x^3{\overline{\smash{\big)}\;21x^4-14x^2+7x}} \\ \underline{-21x^4\phantom{-14x^2+7x*}} \\ 0\phantom{**}\mathbf{-14x^2+7x}\end{aligned}
इथे लक्षात घ्या की 7x^3 ने -14x^2+7x ला भाग जाऊ शकत नाही कारण बाकीची कोटी ही भाजकाच्या कोटीपेक्षा लहान आहे. इथे भाजकाची कोटी 3 आहे आणि बाकीची कोटी 2 आहे आणि त्यामुळे भागाकाराची क्रिया इथेच पूर्ण होते.
म्हणून भागाकार 3y आहे आणि बाकी -14x^2+7x आहे.


\mathbf{10)}\;(25m^4-15m^3+10m+8)\div 5m^3
उत्तर:
\begin{aligned} \\ \mathbf{5m-3}\phantom{*****} \\ 5m^3{\overline{\smash{\big)}\;25m^4-15m^3+10m+8}} \\ \underline{-25m^3\phantom{-15m^3+10m+8*}} \\ 0\phantom{**}-15m^3+10m+8 \\ \underline{-(-\,15m^3)\phantom{+10m+8}} \\ 0\phantom{**}\mathbf{+10m+8}\end{aligned}
इथे लक्षात घ्या की 5m^3 ने 10m+8 ला भाग जाऊ शकत नाही कारण बाकीची कोटी ही भाजकाच्या कोटीपेक्षा लहान आहे. इथे भाजकाची कोटी 3 आहे आणि बाकीची कोटी 1 आहे आणि त्यामुळे भागाकाराची क्रिया इथेच पूर्ण होते.
म्हणून भागाकार 5m-3 आहे आणि बाकी 10m+8 आहे.


Go to top

बहुपदीला द्विपदीने भागणे

बहुपदींचा भागाकार करताना द्विपदीने बहुपदीला भागताना, एकपदीने बहुपदीला भागताना वापरायचीच पद्धत वापरायची आहे.

महत्वाचं:
1) द्विपदीने बहुपदीला भागताना, भाज्याला आणि भाजकाला आधी त्यांच्या उतरत्या कोटीने (उतरत्या घातांकाने) लिहून घ्यावे लागते आणि मग गणित सोडवावे लागते.
2) उतरत्या कोटीने भाज्य लिहिताना जर दिलेल्या मधल्या एखाद्या कोटीचे पद गहाळ असेल, तर त्याचा सहगुणांक 0 (शून्य) मानून ती बहुपदी लिहावी.
उदाहरणार्थ: जर बहुपदी 3x^4+5x^2 अशी असेल तर x^3 चे पद गहाळ आहे आणि ते आपल्याला 0x^3 असं लिहावं लागेल आणि बहुपदी 3x^4+0x^3+5x^2 अशी लिहावी लागेल.

बहुपदींचा भागाकार शिकण्यासाठी बहुपदीला द्विपदीने भागायची काही उदाहरणे आपण सोडवूयात,


Go to top


Go to top

ओळख

You cannot copy content of this page

error: Content is protected !!
Scroll to Top